खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; संतोष धर्माधिकारी, अमित पराशर, यांची विजयी सलामी

पुणे – संतोष धर्माधिकारी, अमित पराशर आणि सिद्धांत पारेख यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवताना पहिल्या स्टरलाईट टेक खुल्या अखिल भारतीय स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. द क्‍यू क्‍लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत डेक्‍कन जिमखाना क्‍लबच्या संतोष धर्माधिकारी याने रोहित गव्हाणकर याचा 45-04, 11-36, 50-11 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. तसेच सिद्धांत पारेख याने अक्षय गायकवाड याचा 47-30, 33-45, 63-34 असा निर्णायक फ्रेममध्ये पराभव करून संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली.

आणखी एका चुरशीर्च्या लढतीत अमित पराशर याने संकेत मुथा याचा 19-61, 69-01, 69-47 असा पराभव करून विजयी सलामी दिली. तसेच साद सय्यद याने लोकेश दिवानी याचा 45-20, 57-41 असा पराभव केला. तर, क्‍यू क्‍लबच्या सद्दाम शेख याने सुमित घडियाली याचा 85-28, 56-28 असा पराभव करून आगेकूच केली. अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या सामन्यात अली हसन याने पिनाक अहाट याचा 62-23, 54-09 असा सहज पराभव करीत दुसरी फेरी गाठली. तसेच ज्ञानराजन सत्पथीने दीपक पाटीलचा 69-20, 52-24 असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्‌घाटन स्टरलाईट टेकचे संचालक प्रवीण अगरवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धा संचालक अलेक्‍स रेगोव, तसेच स्पर्धेतील सहभागी खेळाडू उपस्थित होते.

   सविस्तर निकाल-

गटसाखळी फेरी – ज्ञानराजन सत्पथी वि.वि. दीपक पाटील 69-20, 52-24; साद सय्यद वि.वि. लोकेश दिवानी 45-20, 57-41; सद्दाम शेख वि.वि. सुमित घडियाली 85-28, 56-28; संतोष धर्माधिकारी वि.वि. रोहित गव्हाणकर 45-04, 11-36, 50-11; विवेक म्हेत्रे वि.वि. सैफ अली 59-49, 70-07; सिद्धांत पारेख वि.वि. अक्षय गायकवाड 47-30, 33-45, 63-34; अली हसन वि.वि. पिनाक अहाट 62-23, 54-09; अभिषेक बोरा वि.वि. नरेश अहीर 65-19, 62-35; अमित पराशर वि.वि. संकेत मुथा 19-61, 69-01, 69-47.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)