खुरपणीची लगबग अन्‌ पावसाची प्रतिक्षाही

पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त
वाई,  (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍यात सुरुवातीच्या काळात समाधान कारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके चांगल्या पद्धतीने उगवली आहेत. पिके जोमात जशी जोमात आली आहेत त्याचप्रमाणे गवतही आले आहे. त्यामुळे तालुक्‍यात सर्वत्र खुरपणी लगबग सुरु आहे. मात्र त्याचबरोबर विश्रांती दिलेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात करावी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
पेरणी होण्यासाठी लागणारा पाऊस पडला आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वाई तालुक्‍यातील शेतकरी चिंतेत आहे. पिकांना सध्या पावसाची गरज आहे. पाऊस लवकर न पडल्यास उगवलेली पिके करपून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. धरणक्षेत्रातही चांगल्या प्रमाणात पाऊस पडण्याची गरज आहे. बलकवडी धरणातून होणारा पाण्याच विसर्ग बंद झाल्याने धोम धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. नागेवाडी धरण व धोम धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडत नाही.
निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे अनेक वर्षांपासून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सध्या वाई तालुका द्विधा मनस्थितीत आहे. थोड्या दिवसात दमदार पाऊस पडला नाही तर हंगाम तर वाया जाण्याची चिंता शेतकरी वर्गाला सतावू लागली आहे. त्याबरोबर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. वाईच्या पश्‍चिम भागातील पावसाला जोर नसल्याने भात लागवड वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नैसर्गिक स्त्रोत सुरु असल्याशिवाय भात जोमात येत नाही. शेतात लाखो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांना डोक्‍याला हात लावून बसण्याची वेळ निसर्गाच्या लहरीपणामुळे आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)