खुरंगे यांची कबड्डी संघाच्या व्यवस्थापकपदी निवड

खेड – प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या संघ व्यवस्थापकपदी निवड झाली. खेलो इंडिया अभियानांतर्गत प्रथमच राज्यात सतरावर्षीय वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुलींच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून खुरंगे काम पाहणार आहेत.

या स्पर्धा दिल्ली येथे 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. ज्ञानेश्वर खुरंगे हे कर्जत तालुक्‍यातील खुरंगेवाडीचे सुपुत्र आहेत. कर्जत येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून राज्यात नावलौकिक मिळवला होता. राज्यातून आलेल्या खेळाडूंबरोबरच कोच यांचीही व्यवस्था त्यांनी उत्तम प्रकारे केली होती. त्यामुळे जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे, नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह क्रीडाशिक्षक व कर्जतकरांनी खुरंगे यांचे कौतुक केले होते. खुरंगे यांची निवड झाल्याने त्यांचे ना. राम शिंदे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुभाष तनपुरे, आबा नेवसे, भोसले, आदींनी अभिनंदन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)