खूनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे – पत्नीला कामावर ठेवल्याने कोयत्याने वार करून मसाज सेंटरच्या मालकीणीच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली. त्याला 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शांताराम बिरप्पा निडूणी (वय 25, सावळगाव, ता. अक्कलकोट जि. सोलापूर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी, मंजू नारायण नरकटे (वय 32, रा. अप्पर) आणि दत्तात्रय दिगंबर डोमसे (वय 42, रा. आंबेगाव खुर्द) या घटनेत जखमी झाले आहेत. शांताराम आणि जखमी मंजू पती-पत्नी आहेत. दोघेही पूर्वी टिळक रस्त्यावरील एका आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये कामाला होते. मात्र, दोघांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मंजू या फिर्यादींच्या स्पा-ब्युटी पार्लर या मसाज सेंटरमध्ये कामाला जावू लागल्या होता. मंजू यांना कामास ठेवले म्हणून, शांताराम फिर्यादींवर चिडला होता. याच कारणावरून तो फिर्यादींना फोन करून शिवीगाळ करू लागला. याचा जाब विचारण्यासाठी टिळक रस्त्यावर शांताराम काम करत असलेल्या ठिकाणी फिर्यादी, मंजू आणि दत्तात्रय गेले होते. त्यावेळी फिर्यादी आणि दत्तात्रय यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यामध्ये दोघे जखमी झाले. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या मंजू यांच्यावरही त्याने कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी निडूणी याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)