खुटबाव विद्यालयात आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा कार्यक्रम

केडगाव- खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य हिंदूराव जाधव होते. इयत्ता आठवीचा वर्ग पुढील वर्षी नववीत जाणार असून सकाळच्या सत्रात त्यांची शाळा भरणार आहे. त्यामुळे सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पर्यवेक्षक बाबासाहेब सरतापे, राजेंद्र जगताप, नवनाथ थोरात, दत्तात्रय वाघमोडे, संजय पवार, सुनीता बोत्रे, उपशिक्षक हनुमंत थोरात, भाऊ थोरात आणि इतर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी देशाच्या नकाशाच्या सभोवताली मेणबत्या प्रज्वलित करुन देशाभिमान जागृत करण्यात आला. सूत्रसंचालन मानसिंग रुपनवर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)