खुटबाव येथे किल्ले बनवा स्पर्धा

केडगाव- खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात मुलांसाठी किल्ला बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने या स्पर्धांचे मूल्यांकन होणार असून यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती उपशिक्षक हनुमंत थोरात यांनी दिली. प्रथम सत्र परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागतात. या काळात किल्ले बनवले जातात. विद्यार्थ्यांना आपल्या गड-किल्ल्यांबाबत माहिती व्हावी उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील मुलांचे शिवाजी, प्रताप, वंदना आणि प्रेरणा असे गट पाडण्यात आले. प्रत्येक गटात किल्ले बनवणे, मातीच्या वस्तू तयार करणे,
पणत्यांवर कोरीव काम करणे आणि कागदी आकाशकंदील तयार करणे… अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. परीक्षेचा ताण कमी करणे आणि आनंददायी शिक्षण या सरकारच्या उपक्रमांतर्गत 5 वी ते 8 वी या वर्गांसाठी स्पर्धा होत असून विद्यार्थी त्याचा आनंद घेत असल्याचे दुपार विभागाच्या पर्येवेक्षिका सुनीता बोत्रे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)