खुटबाव महाविद्यालयात संगणक प्रशिक्षण

केडगाव- खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत दहा दिवसाच्या संगणक शिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालय आणि श्‍याम कॉम्प्युटर टेक्‍निकल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, संगणक शिक्षण सध्या काळाची गरज असल्याने भैरवनाथ शिक्षण संस्था नेहमीच अशा उपक्रमांना प्राधान्य देते. हा उपक्रम 1 ऑक्‍टोबर ते 10 ऑक्‍टोबर असा सुरू राहणार आहे. या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव थोरात, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, सहसचिव सूर्यकांत खैरे, संचालक अरुण थोरात, गोरख थोरात, विद्यालयाचे प्राचार्य हिंदूराव जाधव, श्‍याम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)