खुटबावमध्ये स्वातंत्र्य दिनानमित्त कवायत सराव

केडगाव  – खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक कवायतीच्या सराव सुरु असल्याचे आढळत आहे. येत्या मंगळवारी (दि.15) देशाचा 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. या निमित्ताने परिसरातील शाळा -विद्यालयात या दिनाच्या तयारीचा सराव सुरु आहे. खुटबाव विद्यालय हे दौंड तालुक्‍यातील विविध उपक्रम साजरे करणारे विद्यालय म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी या दिवसाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम साजरे होणार असल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले. स्वातंत्रदिनाच्या दिवशी प्रभातफेरी, स्काऊट गाईडच्या मुलांचे संचलन, समूहगीत, देशभक्तीपर गीते, सामूहिक कवायत आदी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सध्या याची तयारी सुरु असून सर्व शिक्षक आणि शिक्षिका विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)