खिशाला परवडेल अशा किमतीत रेडमी ६ भारतात दाखल!

स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी शाओमीने भारतीय बाजारपेठेमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीतर्फे या स्मार्टफोनचे नामकरण ‘रेडमी ६’ असे करण्यात आले असून हा फोन ‘लो-बजेट’ सेगमेंटसाठी लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेडमीतर्फे या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा व फुल व्हिव डिस्प्ले देण्यात आला आहे.

कॅमेरा: या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस १२ मिगापिक्सेल व ५ मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. मागील बाजूच्या कॅमेऱ्यामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशन’ दिल्यामुळे फोटो अथवा व्हिडीओ काढताना कॅमेरा हलला तरी फोटो व व्हिडीओ स्पष्ट निघणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या फीचर्स अनुसार या स्मार्टफोनमधील पुढील बाजूचा कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा असणार आहे. निश्चितच रेडमी ६ मध्ये पुढील बाजूचा कॅमेरा केवळ ५ मेगापिक्सेलचा असल्याने ‘सेल्फी लव्हर्स’साठी ही बाब निराशाजनक आहे.

मेमरी: या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबी इंटर्नल मेमरी व ३ जीबी रॅम दिली आहे. रेडमी ६ ची किंमत लक्षात घेता लो-बजेट सेगमेंट मध्ये ३२ जीबी इंटर्नल मेमरी व ३ जीबी रॅम असलेला हा स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच मेमरीकार्डसाठी स्वतंत्र स्लॉट देण्यात आला असल्याने रेडमी ६ साठी ही देखील एक जमेची बाजू ठरते.

प्रोसेसर:  या स्मार्टफोनमध्ये २ गिगाहर्ट्झचा होलिओ पी २२ हा १२ नॅनोमीटरचा ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. किमतीच्या मानाने प्रोसेसर देखील ठीक-ठाक असून रोज वापरातील फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टग्राम इत्यादी ऍप्लिकेशन्स या स्मार्टफोनवर व्यवस्थित काम करतील. परंतु तुम्ही जर ‘गेमिंग’साठी या फोनचा विचार करत असला तर तुमच्या पदरी निराशा येऊ शकते.

डिस्प्ले व बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये ५.४५” इंचाचा एच.डी. फुल व्हिव डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

एक्स्ट्रा: ७९९९ एवढ्या किमतीमध्ये तुम्हाला या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर व फेस अनलॉक मिळणार असल्याने ही एक चांगली बाब आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
11 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)