चिंचवड – थेरगाव सोशल फाउंडेशन व आंघोळीची गोळी या संस्थेच्या वतीने खिळेमुक्‍त झाडांचे थेरगाव उपक्रम राबवण्यात आला.

बिर्ला रुग्णालय ते केजूदेवी बोटक्‍लब या मार्गावर असलेल्या सर्व झाडांवरील जाहिरातींचे फलक, खिळे, स्टेप्लर पिन्स, बाइंडिंग वायर्स, नायलॉन पट्टया तसेच झाडांमध्ये घुसलेले व तुटलेले ट्री गार्ड काढून झाडांना मुक्त करण्यात आले. नागरिकांना या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.

झाडांवर होणाऱ्या त्रासाविरोधात जागरूक राहण्याचे अवाहन करण्यात आले. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने निलेश पिंगळे, अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, सुशांत पांडे, अनिल घोडेक, मनोज वंजारी, बापू खोसे, मनिषा दणाणे, श्रीकांत धावारे, प्रकाश गायकवाड, अंकुश कूदळे, मयूर कांबळे, रोहीत ढोबळे, अमोल शिंदे, राहुल जाधव, अभिजीत खानविलकर, योगेश ननावरे, सचिन पानढवळे आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)