खिलारवाडी येथे भजनी साहित्य वाटप

जुन्नर- खिलारवाडी (ता. जुन्नर) येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ आणि निमगावतर्फे महाळुंगे येथील सावतामाळी भजन मंडळ (वाघुलेमळा) यांना संगीत पेटी, पखवाज, वीणा, टाळ आदी साहित्याचे वाटप पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले. सावरगाव-धालेवाडीतर्फे हवेलीचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांनी या कामी सहकार्य केले. यावेळी विकी पारखे, नारायण खिलारी, अभिषेक वर्पे, भगवान वाघुले, गणेश वाघुले आणि दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. येणेरे (ता. जुन्नर) येथील आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा आणि प्रसूतीगृह उभारणीकरीता बारा लाखांचा आणि सभामंडपासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)