खिरेश्‍वर येथे गोठ्याला लागलेल्या आगीत शेळ्या खाक

दोन लाख तेरा हजार रुपयांचे नुकसान

ओतूर -खिरेश्वर (ता. जुन्नर) येथे गोठ्यास आग लागून सुमारे दोन लाख तेरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) एकच्या दरम्यान घडली. रामदास पिलाजी भौरले यांच्या घरांशेजारील गोठ्यास दुपारी एकच्या दरम्यान आग लागून त्यामध्ये दोन बैल 80 हजार, एक म्हैस 60 हजार, दोन शेळ्या 19 हजार, तीन बोकड 60 हजार, बैलगाडी 25 हजार, नांगर 4 हजार असे एकूण दोन लाख तेरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आदिवासी बांधवांच्या जनावरांच्या मांडवाला दुपारी अचानक आग लागली. आग इतकी भयंकर होती सर्व ग्रामस्थ मदतीला धाऊनही मांडवातील जनावरे आगीत जळून जबर जखमी झाली. तर शेळ्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. बैल, म्हशी आगीत जळून इतकी जखमी झालेत की त्यांची अवस्था बिकट आहे. दरम्यान घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.
घटनास्थळी मंडल अधिकारी सुनिल बेनके, तलाठी डी. बी. जाधव, समाजसेवक बुधाजी शिंगाडे, सरपंच उषा सुपे पी. के. आसवले, पांडुरंग विठ्ठल भौरले, विजय काठे आदी कार्यकर्त घटनास्थळी उपस्थित होते. खिरेश्वर आणि खुबी येथील ग्रामसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)