खिमजी गाला यांना ‘व्यापार भूषण पुरस्कार’ जाहीर…

पुणे – स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस्‌ असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनचा यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार गुडलक सेल्स डेपोचे खिमजी गाला यांना जाहिर झाला आहे. सोमवार, दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता एस.एम.जोशी सभागृहात पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह रजपूत यांनी दिली.
त्यावेळी उपाध्यक्ष शिरीष बोधनी, सचिन जोशी, गणपतराज जैन, राजेश गांधी, सुरेश नेऊरगांवकर, दिलीप कुंभोजकर, अरविंद पटवर्धन, नितीन पंडित आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलींद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा 22 वे वर्ष आहे.
रजपूत म्हणाले, दरवर्षी व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण करण्यात येते. व्यापार करीत असताना आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यापाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या वर्षी उत्कृष्ट दुकान पुरस्कार नवेली मल्टी ब्रॅन्ड मोबाईल शॉपीचे अरविंद कोठारी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार एसजीटी ऍग्रो फ्रेशचे हर्षल तारु, फिनिक्‍स पुरस्कार कुसुम एंटरप्रायझेसचे नथमल जैन, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार गणेश फुड प्रोडक्‍टस्च्या शैला कर्नावट आणि साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार अश्विनी खोंडके यांना प्रदान करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)