• तळेगावमध्ये प्रेरणा रेनबो अनाथाश्रमातील प्रकार
  • जेवणानंतर उलट्या आणि मळमळीचा त्रास; 11 मुलींवर उपचार सुरू

तळेगाव स्टेशन – तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबो अनाथाश्रमातील 30 मुलींना रात्रीच्या जेवणातून बाधा झाली. खिचडी खाल्ल्याने काही मुलींना उलट्या आणि मळमळ झाली. त्यानंतर त्रास लागल्याने तातडीने उपचारासाठी तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. विजय भवारी यांनी सांगितले.

या अनाथाश्रमात सोमवारी (दि. 3) रात्रीच्या जेवणासाठी खिचडी बनवण्यात आली होती. या खिचडीतूनच ही बाधा झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. कारण खिचडी खाल्ल्यानंतर आश्रमातील काही मुलींना उलटी, मळमळ तसेच चक्‍कर येऊ लागली. त्यांना तातडीने तळेगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अनाथाश्रमातील 30 पैकी 19 मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 11 मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मुलींची प्रकृतीस्थिर असून, सुधारणा होत आहे. त्यांनाही लवकर सोडण्यात येईल. अचानक मुलींना त्रास होऊ लागल्याने मध्यरात्री मुलींना त्रास होऊ लागल्याने डॉ. अरुण जव्हेरी, डॉ. डिसुझा, डॉ. विवेक निर्माले, डॉ. प्रफुल्ल काशीद यांच्या टीमने तातडीने उपचार केल्याने मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

प्रेरणा रेनबो अनाथाश्रमातील 30 मुलींना खिचडी खाल्ल्यामुळे त्रास सुरू झाला. उलट्या आणि मळमळ झाल्यामुळे मुलींना रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर आहे. सकाळी पुन्हा सर्व मुलींची तपासणी केली. उपचारांनंतर कोणालाही विषबाधा झाली असे म्हणता येणार नाही.
– डॉ. विजय भवरी, बालरोग तज्ज्ञ.

सोमवारी सर्व मुलींनी दुपारी समोसा आणि लाडू खाल्ले होते. त्यानंतर सायंकाळीही काही मुलींनी पुन्हा लाडू खाल्ले. रात्रीच्या जेवणात खिचडी खाल्ल्यामुळे मुलींना त्रास झाला. सुरवातील काही मुलींना त्रास झाला, त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र गांभिर्य पाहून सर्वच मुलींची तपासणी केली. आता 11 मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसभरात अन्न निरीक्षकांनी अन्नाचे नमूने नेले आहेत. तसेच पोलिसांनीही चौकशी केली आहे.
कांचन आगळे, समन्वयक, प्रेरणा रेनबो अनाथाश्रम, तळेगाव दाभाडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)