खा. उदयनराजे भाजपमध्ये गेले तर विरोधात काम करणार

श्रीमंत कोकाटे यांची भूमिका
जेम्स लेन वक्तव्या प्रकरणी येळगावकरांनी माफी मागितली पाहिजे
सातारा- भाजपमध्ये खासदार उदयनराजेच नव्हे तर माझा सख्खा भाऊ जरी गेला तरी त्यांच्या विरोधात काम करणार, अशी स्पष्ट भूमिका संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी जाहीर केली. त्याच बरोबर; जेम्स लेन प्रकरणाला किरकोळ म्हणणाऱ्या डॉ. येळगावकरांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकार केला जाईल, असा इशारा कोकाटे यांनी दिला.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, जेम्स लेनने राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत विकृत लिखाण केले. त्यावरून सन 2004 साली देशात आणि महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावरून उदयनराजे यांनी भाजप पक्ष सोडला होता. मात्र, आता लेन प्रकरण किरकोळ असल्याचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर सांगत आहेत.त्यांच्या विधानाचा आम्ही निषेध करित असून त्यांनी तात्काळ राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची साताऱ्याच्या पोवई नाक्‍यावर नाक घासून माफी मागितली पाहिजे. तसेच त्यांची भाजपमधून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी कोकाटे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)