खा.उदयनराजेंसह राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सातारकरांच्या नजरा

दोन्ही बाजूने संस्पेंस कायम 

सातारा,दि.5 – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूरसह रायगड मतदारसंघाच्या उमेदवारीचा घोळ मिटविला. मात्र, राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडविण्यात यश आले नाही. त्यामागे विद्यमान खासदार उदयनराजेंना पक्षांतर्गत विरोध तसेच खा.उदयनराजेंची भाजपशी वाढती जवळीक ही कारणे आहेत. पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीकडून एवढ्यात उमेदवारी जाहीर करण्याचा तर खा.उदयनराजेंकडून पक्ष ठरविण्याचा निर्णय होत नाही. परिणामी दोन्ही बाजूने तुर्त संस्पेस कायम ठेवण्यात आला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या केंद्रस्थानी तुर्त राष्ट्रवादी आणि खा.उदयनराजे एवढी दोनच नावे आहेत. त्यामुळे सध्या या दोन्ही नावांची जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामागे राष्ट्रवादीकडे असलेले कार्यकर्त्यांचे जाळे तर खा.उदयनराजेंकडे वाढती लोकप्रियता ह्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, पक्षांतर्गत कमी अन राजेअंतर्गत अधिक संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर खा.उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध होत आहे. खा.उदयनराजेंनी त्या विरोधाची चिंता न करता भाजपशी अप्रत्यक्ष जवळीक वाढविली आहे. ती नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दिसून आली. परिणामी खा.उदयनराजे व राष्ट्रवादीमधील दरी आणखी वाढत आहे. मात्र, राष्ट्रवादीला खा.उदयनराजेंसारखा हुकुमी एक्का गमावून पुढे विधानसभेत आणखी नुकसान करून घ्यायचे नाही. त्यामुळे इतक्‍यात राष्ट्रवादीसह खा.उदयनराजेंकडून देखील भूमिका स्पष्ट होणार नाही. त्यासाठी निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)