खा.उदयनराजेंच्या उमेदवारीला राजे समर्थकांकडून विरोध

12 मिनिटांमध्ये संपविली बैठक : पवार देणार कार्यकर्त्यांना स्वतंत्र वेळ
सातारा,दि.7 प्रतिनिधी- खा.उदयनराजेंच्या निमित्ताने राज्यात बहुचर्चित झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्यावरून राष्ट्रवादीच्या बैठकीत ना. रामराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्या गटाने अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध केला. यापुर्वी खा.उदयनराजे यांच्या उमेदवारला कोणाचाही विरोध नसल्याचे सांगणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच विरोध झाल्याने केवळ 12 मिनिटांमध्ये बैठक संपविण्यात आली.
राष्ट्रवादीने राज्यातील 48 पैकी 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्‍चित करण्याच्या दृष्टीने शनिवारपासून मुंबई येथील कार्यालयात बैठकांचे आयोजनास सुरूवात केली होती. रविवारी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, अजितदादा पवार, ना. छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा निर्णय घेण्यासंदर्भात बैठक सुरू झाली. यावेळी आ. शिवेंद्रराजेंचे समर्थक व सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला. स्थानिक पातळीवर आमची कुचंबणा होत असून उदयनराजेंनी जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपच्या बरोबर राहून काम केले, असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच तरीही जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार 35 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत, याचा विचार पक्षाने केला पाहिजे. आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पक्षाने निर्णय घेऊ नये. सर्वसमावेशक उमेदवार द्यावा या अविनाश कदम यांच्या भूमिकोला जयेंद्र चव्हाण, राजू भोसले यांनी पाठिंबा दिला. तसेच आ. शिवेंद्रराजे भोसले बैठकीला आले नसल्याने आम्हाला स्वतंत्र वेळ द्यावा, अशी मागणी राजू भोसले यांनी केली.
तर लोकसभेसाठी आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठिंबा दिलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनीही उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला. आपण स्वत:च लोकसभेसाठी इच्छुक असल्याने मानकुमरे यांनी सांगितले. आपल्याला संधी देत नसाल तर सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या रामराजेंना उमेदवारी द्यावी. अशी मागणी मानकुमरे यांनी केली. खंडाळ्यातून जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तानाना ढमाळ व माजी सभापती रमेश धायगुडे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची जाहीर मागणी केली. बैठकीतला सूर लक्षात घेता शरद पवार यांनी बैठक आटोपती घेतली. कराडच्या मानसिंगराव जगदाळे यांनी प्रत्येक तालुक्‍याला बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर स्वतंत्रपणे वेळ देण्यात येईल असे सांगणयात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)