खा.उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : खा. शरद पवार

 

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केला नाही. पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरच खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच साताऱ्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी सांगितले.’साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्यासोबत काल बैठक झाली. या बैठकीत कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही.

‘आम्ही दोन प्रकारच्या बैठका घेतल्या. पहिली लोकसभेबद्दलची आणि दुसरी विधानसभेबद्दलची. कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. आम्ही लवकरच साताऱ्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घेऊ’ असेही शरद पवारांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)