लोणी काळभोर- पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून दिल्यास परिसरातील गावांसाठी संयुक्तपणे 25 टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून त्याद्वारे संबंधित ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन सरू करण्यात येईल, असे आश्वासन शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. पूर्व हवेलीतील आणि पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या गावांमध्ये आज (दि. 13) शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आढळराव बोलत होते. मुळामुठा नदीच्या पात्रात ग्रामपंचायतींकडून टाकण्यात येणाऱ्या कचरा प्रश्नी पंचक्रोशीतील मांजरी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कोलवडी, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, नायगाव, पेठ या ग्रामपंचायतींनी मध्यवर्ती कचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी मोफत कचरा प्रकल्प उभा करून देण्यात येईल, त्यामुळे कचऱ्याचा मर्हवाचा प्रश्न सुटेल आणि ग्रामपंचायतींना उत्पन्न सुरू होईल असे आढळराव यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, प्रशांत काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा कदम, तालुका प्रमुख राजेंद्र पायगुडे, उपतालुका प्रमुख रमेश भोसले, लकी काळभोर, ग्रामपंचायत सदस्य विजय ननवरे, बाळासाहेब काळभोर, रेखा काळभोर, विभाग प्रमुख अनिल कुंजीर, योगेश ऊबाळे, राजेंद्र जोशी, हेमंत कोळपे, तुषार कुंभार, सागर कदम, संकेत भोसले, कुंदा कदम, ऊर्मिला भुजबळ, सविता वर्मा उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)