खास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान

शाहरुख खान दुबईच्या पर्यटनविषयक “बी माय गेस्ट’ या उपक्रमामध्ये सहभागी होतो आहे. त्याने दुबई टुरिझमसाठी काही जाहिरातीही केल्या आहेत. याच उपक्रमाशी संबंधित एक व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला आहे. यामध्ये दुबई शहरामध्ये खूप मौजमस्ती करताना शाहरुख दिसतो आहे. शाहरुख सध्या या उपक्रमाच्या सगळ्या व्हिडीओमध्ये दुबईतील पर्यटनस्थळांना भेटी देताना दिसतो आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये दुबईच्या रस्त्यांवरून पळत एका ठिकाणावरून दुसरीकडे जाताना शाहरुख दिसतो.

या व्हिडीओच्या निर्मात्यांनी शाहरुखचा एक पूर्ण लांबीचा व्हिडीओ बनवला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून काही शॉर्ट मुव्हीमध्ये रुपांतर केले. या त्याच्या 6 छोट्या व्हिडीओमध्ये शाहरुखने आपल्या आवडत्या ठिकाणांना भेट दिल्याचे दिसते आहे. ही कल्पना शाहरुखला आवडली आणि त्याने प्रॉडक्‍शन टीमला खूप चांगले सहकार्य केले. शाहरुखच्या “झिरो’ला बॉक्‍स ऑफिसवर फारसा काही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे शाहरुखने थोडा ब्रेक घेतला आहे. या “झिरो’साठी त्याने जवळपास वर्षभर वाया घालवले होते. आता या “झिरो’ला तो बिजींगच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करणार आहे, असे समजते आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here