खासदार सुळेंनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेर 

नागपंचमीनिमित्त लुटला विविध खेळांचा आनंद 
रेडा: खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपंचमी महोत्सवात जात्यावरील दळण दळून, झिम्मा फुगड्यांचा फेर धरून, उखाणे म्हणत हजारो महिलांच्या समवेत नागपंचमी सणाचा आनंद लुटला.
इंदापूर तालुक्‍यातील सराटी येथील जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नागपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेच्या सदस्य वैशाली पाटील, अभिजीत तांबिले, प्रताप पाटील, वैशाली नागवडे, रहेना मुलाणी, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महारूद्र पाटील, सचिन सपकळ, राजेंद्र तांबिले, भाऊसाहेब सपकळ, अनिल बागल, सचिन देवकर, राज कुमार, अरविंद वाघ, किरण बोरा, अमोल भिसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माती आणि संस्कृती जपण्याचा नागपंचमी महोत्सव जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह शहरात राहणाऱ्या महिलांना अनोखा आनंद लुटण्याची मजा येते आहे. संस्कृती जपण्यासाठी व पारंपरिक महिलांचे खेळ मातीत खेळण्यासाठी नागपंचमी महोत्सव वरदान ठरला आहे, यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे व शिक्षकांनी चांगली मेहनत घेतल्याने हजारो महिलांना हा सण पर्वणी ठरला आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, उपस्थितांचे स्वागत जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे व पंचायत समितीचे सदस्य प्रदीप जगदाळे यांनी केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)