खासदार सुप्रिया सुळे जिरायती भागाच्या दौऱ्यावर

वासुंदे, दि. 12 (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार रमेश थोरात,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी दौंड तालुका दुष्काळी दौरावर आहेत. दरम्यान दुष्काळी भागातील पहाणी करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागाला काय मदत मिळते, याची उत्सुकता ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आहे. दुष्काळी भागातील शेतकरी चारा व पाणी टंचाईमुळे मेटाकुटीस आला आहे. खासदार सुळे यांच्यामार्फत मागील दुष्काळी काळात जनहित रक्षक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल थोरात यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीस एक लाख मदत केली होती. यावेळीही अडचणी भरपूर आहेत; पण काहीतरी मदत मिळेल त्यामुळे खासदार सुळेच्या दौराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवार दि. 13) सकाळी खोर, देऊळगाव गाडा, पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, लाळगेवाडी आदी गावाभेट दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)