खासदार सुप्रिया सुळे उद्या अकोल्यात

अकोले –अकोले येथे गुरुवारी (दि.4) सकाळी 11 वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आ.वैभवराव पिचड उपस्थित होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड राहतील. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राजूरच्या सरपंच हेमलता पिचड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थिंनीची सुरक्षितता, शैक्षणिक प्रश्न, मुलींची छेडछाड व इतर प्रश्नांबाबत खा. सुळे सकाळी साडेआठ वाजता अकोले महाविद्यालयात विद्यर्थिनींशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर तालुक्‍यातील व शहरातील व्यापारी, डॉक्‍टर, इंजिनिअर, प्रतिष्ठित नागरिक आदींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी दहा वाजता त्या विविध समाजघटकांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत महिलांसाठी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यामध्ये खा. सुळे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)