खासदार समर्थकांची साताऱ्यात डॉल्बीमुक्त दहीहंडी

सांगलीच्या गोविंदा पथकाने फोडली हंडी
सातारा,दि.8 प्रतिनिधी- जिल्ह्यात व सातारा शहरात ही ठिकठिकाणी होत असलेल्या दहीहंडी उत्सवांमध्ये डॉल्बीचा समावेश होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी साताऱ्यात डॉल्बीला फाटा देत दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. उत्सवामध्ये डॉल्बीऐवजी लावण्यात आलेल्या दोन स्पिकरच्या माध्यमातून वाजविण्यात आलेली वाद्ये व गीतांवर तरूणाई थिरकल्याचे दिसून आले.
शुक्रवारी साताऱ्यातील तालीमसंघ मैदानावर खासदार समर्थकांनी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. दहीहंडी फोडण्यासाठी पुणे येथील कसबा मंडळ, तासगाव जि.सांगली येथील शिवनेरी व गोखळी ता.फलटणसह इतर दोन गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी आठ वाजण्यांच्या सूमारास सांस्कृतिक गीतांच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. तसेच यानंतर एकापाठोपाठ एका पथकाने थर लावून सलामी दिली. रात्री दहा वाजण्याच्या सूमारास खा.उदयनराजे यांचे उत्सवाच्या ठीकाणी आगमन होताच युवकांनी त्यांच्या नावाचा एकच जयघोष केला. अखेर सव्वा दहा वाजण्याच्या सूमारास तासगाव, जि.सांगली येथील शिवनेरी पथकाने दहीहंडी फोडताच युवकांनी जल्लोष केला. यानंतर खा.उदयनराजेंच्या हस्ते शिवनेरी गोविंदा पथकाला दिड लाख रूपयांचा धनादेश व चषकाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती मनोज शेंडे, समीर माने, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्यासह नगरसवेक व कार्यकर्ते उपस्थित होते.

एक नेता एक आवाज
दोन दिवसांपुर्वी आ.शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी साताऱ्यात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात खा.उदयनराजेंचा जयघोष करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची साताऱ्यात जोरदार चर्चा ही रंगली होती. त्यानंतर शुक्रवारी खा.उदयनराजे समर्थकांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये आ.शिवेंद्रसिंहराजेंचा जयघोष करण्याचा प्रकार घडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)