खासदार रेखा यांच्या जागेसाठी अक्षय कुमारसह अनेक कलाकारांची चर्चा

नवी दिल्ली : कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. यामध्ये व्यावसायिक अनू आगा, क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर आणि चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा समावेश आहे. परंतु, आता रेखाच्या जागी राष्ट्रपतींच्या कोट्यातून कोणाला उमेदवारी मिळणार आहे, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यातच या जागेवर खासदार होण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.

अभिनेत्री रेखाच्या जागेसाठी अक्षय कुमार, जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे सलमान खानचे वडील सलीम खान, विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय, ऋषी कपूर, जॅकी श्राफ, वहिदा रहमान, आशा पारेख, मधुर भांडारकर आणि अनुपम खेर यांच्या नावांची शिफारसही पक्षाकडे करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रेखाच्या जागेसाठी अनेक कलाकारांची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)