खासदार राजू शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान

कोल्हापूर: फेम इंडिया या दिल्लीस्थित नावाजलेल्या मॅगझिनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नुकताच विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पार पडला. यावेळी केंद्रीय विज्ञानमंत्री मंत्री डॉ. हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

फेम इंडिया या दिल्लीस्थित मॅगझिनने देशातील सर्वोत्कृष्ट 25 संसदपटूंचा गौरव केला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांसाठी व कष्टक-यांसाठी संसदेमध्ये लढणारा सर्वोत्कृष्ट चर्चित संसदपटू म्हणून त्यांचा समावेश केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी हे पंचवीस वर्षे शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे. गेली दोन टर्म ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. संपूर्ण देशभरातील शेतकरी संघटनांना एकत्रित करून त्यांना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीद्वारे शेतकरी चळवळ संपूर्ण देशभर नेण्याचे काम त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)