संस्थेला निवेदन : संबंधित शिक्षकाला निलंबित करा
पिंपरी- भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विषयी “फेसबूक’वर आक्षेपार्ह “कमेंट’ केल्याने शिक्षक संजय कुऱ्हाडे यांच्या विरोधात भाजपच्या पिंपरी-चिंचवड महिला मोर्चाने आंदोलन केले. शिक्षक कुऱ्हाडे याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्षा शैला मोळक यांनी केली आहे.
याबाबत कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी इथापे यांना शैला मोळक यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील प्रेरणा विद्यालयातील सहशिक्षक संजय कुऱ्हाडे याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या “फेसबूक पोस्ट’वर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याबाबत अश्‍लील “कमेंट’ केली. महिलांच्या सुरक्षेबाबत समाजात चर्चा सुरू असताना अशा प्रकारच्या कमेंट करणे चुकीचे आहे. प्रेरणा विद्यालयातील सहशिक्षकाने केलेल्या या कृत्याबद्दल त्याला तात्काळ संस्थेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
यावेळी उमा खापरे, संगीता सुतार, अरुणा घोळवे, सारिका चव्हाण, रेखा कडाली, सविता कर्वे, राधिका बोर्लीकर, शोभा भराटे, माधवी इनामदार, राजश्री जायभाय, पल्लवी वाल्हेकर, अश्विनी औसेकर, अश्विनी दाभाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)