वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील वडगाव येथे केशवनगर, सांगवी या भागाला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचे भूमीपूजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले.
या वेळी पुणे विभागाचे क्षेत्रीय रेल्वे आधिकारी मिलींद देऊळकर, कृष्णाथ पाटील तसेच पंचायत समीतीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, भास्कर म्हाळसकर, गणेश ढोरे, बाळासाहेब ढोरे, चंद्रशेखर भोसले, राजु खांडभोर, पंढरीनाथ ढोरे, सुरेश गायकवाड, भारत ठाकूर, चंद्रकांत भोते, सतीश इंगवले, महेश धुमाळ, प्रवीण ढोरे, प्रवीण ढोरे, गिरीश सातकर, युवराज सुतार, अनिकेत घुले, आशाताई देशमुख व सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील वडगाव येथील केशवनगर भागाला जोडणाऱ्या सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येत असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे भूमीपूजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार या कामाची सुरवात करण्यात आल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, वडगाव बरोबरच तळेगाव येथे ही भुयारी मार्गाचे काम चालू झाले असून याचा लाभ या भागातील नागरीकांना होणार असून, या भुयारी मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात टळणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.
गेल्या चार वर्षात रेल्वेशी संबंधीत अनेक प्रश्न मार्गी लावले असून, लोकल सेवा अधिक सुकर करण्यात येत असून, लोकांमध्ये लवकरच सिसी टी. व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर बॅचेस बसवण्यासाठी पंचवीस लाखांचा निधी रेल्वे विभागाला दिल्याने पुढील काळात हे काम पूर्ण होणार आहे. लोणावळा दरम्यान दळणवळणा बाबत होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणखी पाच भुयारी मार्ग करण्याचे नियोजन आहे.
पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या सर्वेक्षणाचे काम चालू आहे हे काम काहीच महिन्यात पूर्ण होणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाईल.
या प्रसंगी रेल्वेचे क्षेत्रीत अधिकारी मिलिंद देवस्कर यांनी सांगितले की, भुयारी मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. लोणावळा ते वडगाव पर्यंतच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे लोकलचे वेळापत्रक सुधारले असून पुण्यापर्यंत काम झाल्यानंतर त्यात आणखी सुधारणा होईल. रेल्वे स्टेशनवरील सुविधांवर प्रशासन भर देत असून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अनेक गैरसोयी दूर करत आहे. त्यात स्थानकावरील शेडची रूंदी वाढवणे, रेल्वे प्लॉट फॉर्म दुरूस्ती अशा उपाय योजना करीत आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी अनेक ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग व पदचारी पूल करण्यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशिल असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा