खासदार फंडातून 40 लाख देण्याच्या आमिषाने फसवणूक

पुणे,

शैक्षणीक संस्थेस खासदार फंडातून 40 लाख मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची 4 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात बाप -बेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजितकुमार डे (रा.आदित्य गार्डन सिटी, वारजे) व कृष्णा अजितकुमार डे उर्फ कृषा रामप्रकाश छाडी(19,रा.आदित्य गार्डन सिटी, वारजे, मुळ पश्‍चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी विश्‍वंभर बाबर(54,रा.म्हसवड, ता.माण.जि. सातारा) यांना आरोपींनी त्यांच्या कृषी विकास प्रतिष्ठान, देवापुर या शैक्षणीक संस्थेत एका खासदाराकडून 10 लाख रुपये फंड असा चार राज्यसभा खासदारांकडून 40 लाख रुपये फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर त्यांचा विश्‍वास संपादन करुन कमिशनपोटी 4 लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर संपर्क साधण्यास टाळाटाळ केली. पैसे दिल्यानंतर ते अद्यापर्यंत फिर्यादीला भेटले नाहीत. फोनवरुन फंडाबाबत चौकशी केली असता तुम्हाला पैसे देणार नाही, बघुन घेऊ, तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच आकाश देशमुख (22,रा.म्हसवड, ता.माण, जि.सातारा) याच्याकडूनही केंद्रीय उत्पादन शुल्क खात्यात नोकरी लावतो म्हणून त्यांचही फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
राष्ट्रपती भवनात कामाला असल्याचे सांगत सापळ्यात अडकवले*
यासंदर्भात माहिती देताना महिला पोलीस उपनिरीक्षक पी.एस.गायकवाड यांनी सांगितले, यातील आरोपी कृष्णा हा फिर्यादी यांच्या मुलगा इंद्रजीत याचा वर्गमीत्र आहे. दोघेही स.प.महाविद्यालयात बीएच्या तीसऱ्या वर्गात शिक्षण घेतात. इंद्रजीतने वडिलांची शैक्षणीक संस्था असल्याचे सांगत कृष्णा बरोबर वडिलांची ओळख करुन दिली होती. तर कृष्णाने त्याचे वडिल राष्ट्रपती भवनात कामाला असून ते ओळखीने खासदारांचा फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. याप्रमाणेच इंद्रजीतचा मित्र आकाश यालाही क्रेंदीय उत्पादन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेपाच लाख रुपये उकळले होते. यातील कृष्णाला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)