खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधातील याचिका मागे

नगर : खासदार दिलीप गांधी व नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या निवासस्थानाच्या अतिक्रमणाविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात आली आहे. विनोद गांधी यांनी ही याचिका दाखल केली होती. खासदार गांधी यांच्या निवासस्थानाच्या अतिक्रमणासंदर्भात विनोद गांधी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

गांधी यांनी यावर म्हणणे सादर केले होते. दरम्यान, मूळ मालकांनी देखील दिवाणी न्यायालयात 2017 रोजी दावा दाखल करून मिळकत सोमनाथ तानाजी दाभाडे यांच्याकडून 1994 साली खरेदी केली आहे. त्यापूर्वी 1982 मध्ये मूळ मालकांनी त्यामध्ये परवानगीनुसार बांधकाम केलेले होते.

-Ads-

त्यानंतर 30 ते 35 वर्षे कोणाचीही तक्रार नव्हती. केवळ राजकीय व्देषातून अतिक्रमणबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. या युक्तीवादानंतर न्यायालयाने सदर मिळकतीचे वॉलकंपाऊंड पाडण्यास मनाई हुकूम दिला आहे. उच्च न्यायालयात जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी मूळ मालक सरोज दिलीप गांधी, संगीता अनिल गांधी, छाया अशोक गांधी यांच्यातर्फे ऍड. नितीन गवारे यांनी युक्तीवाद केला. बांधकाम हे मूळ मालकांनी 1982 मध्ये परवानगीनुसार केले आहे. कोणतेही अतिक्रमण केले नाही. सरोज गांधी यांचे पती खासदार व मुलगा नगरसेवक असल्याने राजकीय व्देषातून तक्रारी केल्या आहेत, असा हा युक्तिवाद केला आहे. सदर याचिकेची 26 नोव्हेंबरला सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिका मागे घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)