खासदार गांधींनी प्रशासनातील विरोधाभासावर ठेवले बोट 

मनपा आणि पोलिसांकडून जाहिरात फलकांना मिळेना परवानगी 

नगर: महापालिका निवडणुकीतील प्रशासकीय पातळीवर विरोधाभासावर खासदार दिलीप गांधी यांनी लक्ष वेधले आहे. जाहिरातीचे फलक लावण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. परंतु दोन्ही विभागाने एकमेकांकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे परवानगी मिळणे अवघड होऊन बसले आहे. याबाबत खासदार दिलीप गांधी यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे प्रशासनातील विरोधाभासाची तक्रार केली आहे.

-Ads-

खासदार गांधी यांनी म्हटले आहे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्‍चित झाले आहे. प्रचाराची तयारी सुरू झाली आहे. फलक उभे करायचे आहेत. यासाठी आवश्‍यक असलेली परवानगींसाठी उमेदवार प्रशासनाकडे जात आहेत. परंतु त्यावर लगेच कारवाई होत नाही. महापालिकेकडे परवानी मागितल्यावर ते पोलिसांकडून परवानगी घेऊन या असे म्हणतात. पोलिसांकडे गेल्यावर ते म्हणतात फलक लावण्यासाठी आमच्या विभागाची परवानगीची गरज नाही. या दोन्ही विभागाच्या विरोधाभासामुळे उमेदवारांच्या प्रचाराचा फलक उभे करण्यास दिरंगाई होत आहे, असेही खासदार गांधी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभाग, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि इतर विभागांची संयुक्त बैठक घ्यावी, अशीही मागणी खासदार गांधी यांनी केली आहे. जिल्हा निवडणूक शाखेला देखील या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)