खासदार गटाच्या विरोधात नगरविकास आघाडी आक्रमक

मनमानी थांबवा अन्यथा परिणामांची तयारी ठेवा,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातारा – प्रतिनिधी
सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचा भ्रष्ट व मनमानी कारभार सुरू आहे. तो त्यांनी वेळीच थांबवावा. किमान प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर चौकटीत काम करावे. मनमानी आवरती घ्या अन्यथा आम्हाला आमच्या पध्दतीने आंदोलन करावे लागेल मग परिणामांची तयारी ठेवा असा थेट इशारा आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. सातारा पालिकेची 16 मे रोजी झालेली सभा बेकायदेशीर आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट हस्तक्षेप करून त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घ्यावी अशा मागणीचे निवेदन शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सादर केले. पत्रकार परिषदेत बोलताना शिवेंद्र राजे म्हणाले खासदारांच्या सातारा विकास आघाडीकडून पालिकेत मनमानी कारभार सुरु आहे. बहुमताच्या जोरावर विकास कामे हाणून पाडण्याचं राजकारण सुरू आहे. नगरपालिका कुणाच्या मालकीची नाही सातारा विकास आघाडीकडून नगरविकास आघाडीच्या बारा व पर्यायाने सातारा शहरातील साठ हजार नागरिकांवर अन्यायं सुरू आहे. कसल्याही पध्दतीचा आचार व विचार साविआकडे उरलेला नाही. पालिकेतील मनमानी साविआने तत्काळ थांबवावी. आमदार या नात्याने सातारा शहराचा विकास ही आमचीपण जवाबदारी आहे. विरोधाचे राजकारण सोडा अन्यथा परिणामांची तयारी ठेवा असा सणसणीत इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कायद्याचे राज्य करावे अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन छेडावे लागेल मग आंदोलनाचे गुन्हे आमच्यावर दाखल झाले तरी चालतील असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.16 मे चा अजेंडा हा बेकायदेशीर आहे. ही सभा बहुमताच्या जोरावर गुंडाळण्यात आली. 308 अंर्तगत ही सभा रद्द करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवेंद्र राजे यांनी केली. यावेळी पक्षनेते अशोक मोने, पक्षप्रतोद अमोल मोहिते, रविंद्र ढोणे; शकील बागवान, प्रवीण पाटील, इ सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

आमदारांनी मांडली ‘ साशा’ ची कुंडली
स्थानिक भूमीपुत्रांची घंटागाडी सुरू असताना महिन्याला त्यांची बिले पाच लाखापर्यंत निघायची. मात्र 10 जानेवारीपासून साशा या ठेकेदार कंपनीला घंटागाडी सेवेचे सहा महिन्यात प्रतिमाह एकोणीस लाख रुपयांप्रमाणे साठ लाख रुपये अदा करण्यात आले. बिलांत इतकी वाढ होते कशी? सातारकरांच्या पैशातून काम न करणारे ठेकेदार पोसण्याचे कारण काय? असा प्रश्न शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)