खासदार, आमदारांनी किती तरुणांना नोकरी लावली?

चिंबळी- केंद्रात सत्ता असतानाही खासदार व आमदारांनी खेड तालुक्‍यात काय विकासकामे केली व किती तरुणांना नोकरीला लावले असा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपस्थित केला आहे.
माजगाव (ता. खेड) येथे भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचे औचित्य साधून शाळा बाधकांचे व सभामंडप तसेच समामंदिर व सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार दिलीप मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखडे, खेड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, माजी सभापती विलास कातोरे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच रेश्‍मा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य भारती कातोरे, उपाध्यक्ष बेबी अवघड, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, पवन पाटारे, अर्जुन अवघडे, खंडू पाटारे, हेमंत जैद, बाळासाहेब बर्गे, अजंना पाटारे आदि मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. दिलीप मोहिते म्हणाले की, गावचा विकास करायचा असेल तर राष्ट्रीवादी कॉंग्रेसच्या पाठीमागे उभे राहून विद्यमान खासदार व आमदार यांना येत्या निवडणुकीत जनतेने धडा शिकवला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)