खासदार आढळराव यांनी अभ्यास करुन बोलावे !

  • कचऱ्यावरुन रणकंदन : एकनाथ पवार यांचा शिवसेनेला सल्ला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परंतु, शिवसेना कचऱ्याचे राजकारण करत आहे. प्रकल्पाची सविस्तर माहिती न घेता शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकल्पाचा अभ्यास करुन बोलावे, सल्ला पालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मंगळवारी(दि.24) दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे कचऱ्यातून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) हा डीबीओटी’ तत्वावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अन्टोनी लारा एन्व्हायरो व ए. जी. एन्व्हायरो या दोन भागीदार कंपनीस 21 वर्षे कराराने डेपोची जागा भाडेतत्वावर देण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली आहे. हा वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प नसून “वेस्ट टू मनी’ प्रकल्प आहे. कचऱ्यातून नक्की किती वीज निर्मिती होईल हे माहिती नाही. परंतु, कचरा जाळून वीज निर्मितीच्या नावाखाली सत्ताधारी करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारणार आहेत, असे गंभीर आरोप सोमवारी (दि.23) शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केले होते.

-Ads-

शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी दोन वर्षांनंतर पालिका केवळ टॅपिंग शुल्क उपलब्ध करुन देत आहे. देशात विविध ठिकाणी वेगवगळे प्रकल्प सुरु आहेत. मोशीतील “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प या प्रकल्पांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेने या प्रकल्पाचे राजकारण करु नये.

भाजप शिरूर, मावळ लोकसभा स्वतंत्रपणे लढविणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे शिवसेना लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातून स्वबळावर निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)