खासदाराशी संबंधित 239 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – एका पॉन्झी घोटाळ्याशी निगडीत मनी लॉण्डरिंग चौकशी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 239 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. ती मालमत्ता खासदार के.डी.सिंह यांच्याशी संबंधित रिअल्टी कंपनीची आहे.

सिंह यांना तृणमूल कॉंग्रेसने राज्यसभा सदस्य बनवले. मात्र, त्या पक्षाने त्यांना काही काळापासून दूर ठेवले आहे. सिंह यांनी संबंधित कंपनीच्या अध्यक्षपदाचा 2012 मध्ये राजीनामा दिला. मात्र, त्यांच्या राज्यसभा प्रोफाईलमध्ये त्यांचा संबंधित कंपनीचे संस्थापक म्हणून उल्लेख आहे. त्या कंपनीने अवैध गुंतवणूक योजना सुरू केली होती. त्या योजनेशी संबंधित घोटाळा तब्बल 1 हजार 900 कोटी रूपयांचा आहे. त्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीने मागील वर्षी सिंह यांना समन्स बजावले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)