खासदारांपेक्षा प्रायमरी शिक्षकांची कमाई जास्त – हरीश द्विवेदी 

नवी दिल्ली – भाजपच्या उत्तरप्रदेशमधील खासदाराने खासदारांच्या पगारावरून अजब विधान केले आहे. खासदारांच्या  कमाईपेक्षा जास्त प्रायमरी शाळेच्या शिक्षकांची कमाई असते, असे विधान खासदार हरीश द्विवेदी यांनी केले आहे. बस्तीमधील जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित युवा संसदेत ते बोलत होते.

हरीश द्विवेदी यांनी म्हंटले कि, जर एखाद्या खासदाराला आपल्या मतदान क्षेत्रात चांगले कार्य करायचे असेल. तर त्याला कमीत-कमी १२ लोकांची गरज असते. खासदाराने चोरी करू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या सुविधा वाढवल्या पाहिजे. मी सांगू इच्छितो कि आजकाल एका प्रायमरी शिक्षकाची कमाईही खासदारापेक्षा जास्त आहे. मी या मुद्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदारांचे पगार वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवल्याबद्दल हरीश द्विवेदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची स्तुती केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)