खासदारांनो, तीन लाख ‘खरे’ लाइक्स मिळवा-मोदींच्या सूचना

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ट्विटरबाबत एक अहवाल आला होता, त्यामध्ये जगभरातील नेत्यांच्या खोट्या फॉलोअर्सबाबत माहिती देण्यात आली होती. या अहवालानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना तीन लाख ‘खरे’ लाइक्स मिळवण्याचं लक्ष्य दिल्याचे सांगण्यात येत आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, शुक्रवारी दिल्लीमध्ये भाजपाच्या नव्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी खासदारांना याबाबत निर्देश दिले. इतकंच नाही तर ज्या खासदाराचे तीन हजार लाइक्सचे लक्ष्य पूर्ण होईल, पंतप्रधान स्वतः त्याच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबत लाइव्ह व्हिडीओ कॉल करतील असंही  वर्तमानपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

या बैठकीत पंतप्रधान मोदींनी उपस्थित खासदारांना कितीजण फेसबुकवर आहात असे विचारले. त्यानंतर किती जणांच्या पेजवर 3 लाख लाइक्स मिळतात हे विचारले असता खूप कमी जणांचे हात वर होते. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्वच खासदारांना तील लाख लाइक्सचं लक्ष्य दिलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकांना केवळ एक वर्ष बाकी असताना सोशल मीडियाचा योग्य आणि चांगला वापर करण्याचा हा संदेश पंतप्रधान मोदींनी आपल्या खासदारांना दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)