खासदारांचे वेतन गेल्या 6 वर्षात 4 वेळा वाढले – वरूण गांधी

बडोदा – खासदारांचे वेतन गेल्या 6 वर्षात 4 वेळा वाढल्याची माहिती भाजपा खासदार वरूण गांधी यांनी दिली आहे. खासदारांचे वेतन आणि भत्ते निश्‍चित करण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. खासदारांच्या या वेतनवाढीमुळे खरोखरच काय फायदा झाला आहे? असा प्रश्‍न त्यांनी खासदारांच्या वेतनवाढीवरून केला आहे, नवरचना विश्‍वविद्यालयात “नवभारताच्या संकल्पना’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

व्यत्ययांमुळे संसदेचे कामकाज चालण्याचे दिवस कमी होत असूनही खासदारांची वेतने वाढत आहेत असे स्पष्ट करताना वरुण गांधींनी काही आकडेवारी सादर केली. 1952 ते 1972 या काळात संसदेचे कामकाज 130 दिवस चालत असे. गेल्या वर्षी ते केवळ 50 दिवसच चालले. तेव्हा खासदारांचे वेतन वाढल्यामुळे काय फायदा झाला? असा प्रश्‍न त्यांनी विचारला. या संदर्भात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना आपण एक पत्र लिहिले असून श्रीमंत खासदारांनी उर्वरित काळासाठीचे आपले वेतन सोडून द्यावे अशी विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसभेच्या 180 सदस्यांनी आणि राज्यसभेच्या 75 सदस्यांनी आपली संपत्ती 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे. जर अशा सदस्यांनी आपले वेतन घेतले नाही, तर शेकडो कोटी रुपये वाचतील आणि सरकारी खजिन्यात भर पडेल असे त्यांनी सांगितले आहे. संसदेत महिलांना आरक्षण देऊन शिक्षिका, वकील, डॉक्‍टर्स अशा क्षेत्रातील महिलांना निवडून येण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आवश्‍यकतेवर त्यांनी भर दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)