नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी आपल्या खासदारांची लोकप्रियता पाहण्यासाठी दिल्लीचे सर्वेक्षण करणार आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने राजधानीताल सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा जिंकल्या होत्या. सन 2019 च्या निवडणुकीत अशीच कामगिरी पुन्हा करण्यासाठी काय काय आव्हाने आहेत हे जाणून घेणे हा देखील या सर्वेक्षणाचा हेतू आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एका कन्सल्टन्सी कंपनीमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येण्याची शक्‍यता भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली आहे.

आपल्या या सात खासदारांचा मतदार पुढील निवडणुकीत स्वीकार करतील काय? हे जाणून घेण्याबरोबरच त्यांनी या कालावधीत केलेली कामगिरी, सरकारच्या विविध योजनांचे क्रियान्वयन अणि कार्यक्रमांचा प्रभावही या सर्वेक्षणामुळे जाणून घेता येणार आहे.

यासाठीची प्रश्‍नावली तयार केलेली असून मिळालेली माहिती राष्ट्रीय आणि दिल्लीच्या युनिट्‌सकडे पाठवण्यात येईल.

दिल्लीत भाजपाला मुख्य आव्हान आहे, ते आपचे आणि कॉंग्रेसचे. या दोन पक्षांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात त्याच्याच पक्षांना जास्त जागा मिळणार असल्याचे दिसून आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)