खासगी शिक्षण संस्था आंदोलनाच्या तयारीत

दिवाळीनंतर शाळा बंद ठेवण्याचा इशारा

पुणे – राज्यातील खासगी शिक्षणसंस्थांच्या विविध प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने शाळा बंद आंदोलन केले. शासनाने याची दखल घेऊन प्रलंबित प्रश्‍न न सोडविण्यास दिवाळीनंतर बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने शुक्रवारी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले. बऱ्याचशा संस्थांनी शाळा बंद ठेवल्या. तर, काही संस्थांच्या शाळा नियमितपणे सुरू होत्या. यामुळे आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले.

राज्यातील बहुसंख्य संस्थांमध्ये शिक्षकांबरोबरच लिपीक, शिपाई ही पदे रिेक्त आहेत. शासनाने गेल्या सहा वर्षांपासून भरती बंद केल्यामुळे त्याचे विपरित परिणाम संस्थांच्या कामकाजावर होऊ लागले आहेत. शासनाकडून संस्थांना नियमितपणे अनुदानही मिळत नसल्याचे संस्थांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर शासनाने गेल्या चार वर्षांत एकदाही बैठक घेतलेली नाही. संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयात दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. शासनाने तत्काळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन प्रलंबित प्रश्‍न सोडवावेत, या विविध मागण्या व समस्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)