खासगी शाळेतील फी वाढीविरोधात पालकांना तक्रार करता येणार

तक्रारीसाठी शुल्क नियंत्रण समिती कार्यान्वित करणार
मुंबई – खासगी शाळेत मनमानीपणे वाढविण्यात येणाऱ्या फी वाढीला आता चाप बसणार आहे. खासगी शाळांनी भरमसाठ फी वाढ केल्यास पालकांना आता तक्रार करता येणार आहे. या तक्रारींची दखल घेऊन खासगी शाळांवर कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.

शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची प्रथा व शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) लागू करण्यात आला आहे. खासगी शाळांनी फी वाढवल्याच्या विरोधात पालकांना अन्याय वाटला तर ते शुल्क नियंत्रण समितीकडे दाद मागू शकतात. 25 टक्के पालकांनी एकत्रीत येवून तक्रार केली तर कायद्यानुसार खासगी शाळेवर कठोर कारवाई केली जाईल., असे तावडे यांनी स्पष्ट केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून शुल्क नियंत्रण समितीकडे पालकांना तक्रार करता येईल. त्यामुळे आता खासगी शाळांना लुट करता येणार नाही.

खासगी शाळांना शाळेच्या वस्तू, पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करता येवू नये यासाठी पीटीए संघटनेला अधिकार देण्यात आला आहे. पालकांनी जागृत होवून पीटीएमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे तावडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)