खासगी बॅंकांकडून शेतकऱ्यांचा पीकविमा देण्यास टाळाटाळ

नांदेड – राष्ट्रीय पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी पीकविमा आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना पिकांचा विमा एवढ्या मोठ्या रक्कमेत मिळाला नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून पीकविमा शेतकऱ्यांना शासनाकडून मिळत असला तरी खासगी बॅंकधारकांकडून पीकविमा देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पिकविमा योजना जाहीर केली. ही योजना ज्या शेतकऱ्यांनी ज्या बॅंकेतून पीककर्ज घेतले आहे, अशाच बॅंकेत शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा असे सांगितले होते. हा विमा बॅंकवाले शेतकऱ्यांच्या खात्यातील रकमेतून वजा केले जात होते. सुरूवातीला सर्वच बॅंकधारकांनी पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचे कागदपत्रे घेतली पण आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विमा मंजुर झाल्याने अनेक खासगी बॅंकवाल्यांचे डोळे फिरले. आम्ही तुमचा विमाच भरला नाही, आमच्याकडून भरण्यासाठी विलंब झाला किंवा जे अधिकारी, कर्मचारी पीकविमा भरण्यासाठी नेमले होते त्यांच्या बदल्या इतर ठिकाणी झाल्या आहेत यामुळे आता काही होऊ शकत नाही असे उडवाउडवीचे उत्तरे शहरातील अलाहाबाद बॅंक, युनियन बॅंक, देना बॅंक या बॅंकेकडून सर्रासपणे शेतकऱ्यांना असे उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत.

अलाहाबाद बॅंकेत काही शेतकऱ्यांनी मॅनेजरशी वाद निर्माण केला होता. यानंतर मॅनेजनरने चौकशी करून तुम्हाला सांगतो असे सांगितले आणि तुमचे पैसे जमा झालेत असे सांगितले. वाद घातल्यानंतर पैसे कसे जमा झाले हाही संशोधनाचा विषय आहे. शासनाने कर्जमाफी केल्यामुळे बॅंकवाल्यांना शासनाकडून कधी पैसे मिळतील आणि आम्ही या पैशांची कधी परतफेड करायची असाच विचार बॅंकवाल्यांसमोर पडला असावा यामुळे शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे आपल्याकडे आले असून याच पिकविम्यावर आपण डल्ला मारायचा या उद्देशाने वरील बॅंकांनी मार्ग अवलंबिला आहे. सदरील बॅंकेच्या मॅनेजरची व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांचा विमा तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून समोर येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविला आहे, कारण केंद्र सरकारने आतापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध करून दिली असतानाही बॅंक कर्मचारी मात्र ही रक्कम देण्यासाठी जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)