खासगी बॅंकांकडून कर्जपुरवठा वाढला

 लघुउद्योग क्षेत्राचेही एनपीए वाढले असण्याची शक्‍यता

मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्या नंतर सध्या तरी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर खासगी बॅंकांकडून कर्ज घेण्याच्या प्रमाणात वेगाने वाढ होत आहे, असा दावा जेष्ठ बॅंकर उदय कोटक यांनी केला आहे. ते म्हणाले की, सध्या एकूण कर्ज वितरणात खासगी बॅंकाचा वाटा 30 टक्‍के इतका आहे. पुढील चार वर्षात हे प्रमाण 50 टक्‍के इतके होण्याची शक्‍यता आहे.

त्याबरोबर आतापर्यंत फक्त मोठया कंपन्यांनी कर्ज परत न केल्यामुळे बॅंकाची अनुत्पादक मालमत्ता वाढत असल्याचे समजले जात आहे. ही अनुत्पादक मालमत्ता 8 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बॅंका, रिझर्व्ह बॅंक आणि सरकारही हैराण आहे. मात्र छोट्या उद्योगांनाही मोठया प्रमाणात कर्ज दिले गेले आहे.

ते परत मिळविण्यासाठी बॅंकांना आगामी काळात प्रयत्न करावे लागणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, छोटया आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत फारसे प्रश्‍न नाहीत असे समजले जात आहे. मात्र परिस्थिती तशी नाही. आता रिझर्व्ह बॅंकेने 12 फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून सर्व अनुत्पादक मालमत्ताची माहिती देण्यास सांगीतले आहे. ही माहीती बाहेर आल्यानंतर बॅंकाच्या वेदना वाढणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

या अगोदही बॅंका मोठया कर्जाला अनुत्पादक मालमत्ता म्हणून दाखविण्यास टाळाटाळ करीत होत्या मात्र पाणी गळ्यापर्यंत आल्यानंतर या बॅंकानी आता माहीती जाहीर केली आहे. अशीच माहीती लघु उद्योगाबाबतही असण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगींतले. आता सरकार आणि बॅंकानी कर्ज वसुलीसाठी कडक उपययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बॅंकांना आतापर्यंत न सांगीतलेली माहीती सांगावी लागणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले की, निरव मोदी आणि चोक्‍सी यांनी केलेला घेटाळा तशा प्रकारचा एकच आहे, असे गृहीत धरावे लागणार आहे. मात्र आता येथुुन पुढे असा प्रकार घडणार नाही यासाठी सर्वानी परस्परावर आरोप न करता काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगींतले. बॅंकावरील लोकांचा विश्‍वास कमी झाल्यास सर्वानाच महागात पडणार आहे. आता कर्ज बुडण्यात आपला क्रमांक ग्रीस आणि इटलीनंतर येतो. त्यामुळे जागतीक पतळीवरही आपल्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे.

2008 मध्ये मंदी आल्यानंतर उद्योगांना नियमाकडे फारसे लक्ष न देता कर्ज देण्यात आले. नंतर त्या कर्जाची पुन्हा पुन्हा फेररचना करण्यात आल्यामुळे अनुत्पादक मालमत्तेचा प्रश्‍न उग्र झाला असल्याचे त्यांनी सांगीतले. जेवढे कर्ज दिले त्यातील 40 टक्‍के जरी परत आले तरी समाधान मानावे अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगींतले. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किरकोळ कर्जे दिली जात आहेत. त्यामुळे एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे. तशीच पध्दत मोठ्या कर्जासाठी वापरण्याची गरज आहे. कोटक बॅंकही अश्‍या आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्त काम करता येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)