खासगी बॅंकांइतके सरकारी बॅंकांना कार्यचालन स्वातंत्र्य हवे: पद्मनाभन 

पायाभूत सुविधांना दिलेल्या कर्जामुळे बॅंका आल्या अडचणीत 
नवी दिल्ली: सरकारी बॅंकांसमोर खराब कर्जासह अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ते प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारी बॅंकांना खासगी बॅंकाइतकी कार्यचालन स्वायत्तता असण्याची गरज असल्याचे बॅंक ऑफ इंडियाचे अकार्यकारी अध्यक्ष जी. पद्मनाभन यांनी सांगितले.
बॅंकेसमोरील बहुतेक प्रश्‍नाचा सबंध मालकी हक्‍कासंबंधी नाही तर कार्यचालनाशी आहे. एका बॅंकिंग परिषदेत बोलताना ते म्हणाले की, खासगी बॅंकांना ज्या स्वायत्ततेने काम करता येते. त्या स्वायत्ततेने सरकारी बॅंकांना काम करता येत नाही. त्यामुळे बॅंकांचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
ते म्हणाले की, बॅंक ऑफ इंडियाचे एनपीए वाढले आहे. बॅंकांच्या समूहानी काही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज दिले. त्या समूहाचे नेतृत्वही बॅंक ऑफ इंडियाकडे नव्हते. तरीही या कर्जामुळे बॅंक ऑफ इंडिया आता अडचणीत आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीच बाब कमी अधिक प्रमाणात इतर बॅंकांची असल्याचे त्यांनी सांगितले.
या एनपीएमुळे 21 सरकारी बॅंकांपैकी 19 बॅंकांच्या तोट्यात वाढ होऊन तो 87357 कोटी रुपये इतका झाला आहे. त्यातच काही बॅंकांतील घोटाळ्याने हा प्रश्‍न आणखी गंभीर बनविला आहे. फक्‍त विजया बॅंक आणि इंडियन बॅंकेला थोडा फार नफा होऊ शकलेला आहे. तर बॅंकांचे एकूण एनपीए 8.31 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. बॅंकांना अधिक स्वायत्तता दिल्यास हे प्रश्‍न कमी होण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)