खासगी बसेसला आता दोन मिनिटांचाच थांबा

वाहतूक पोलिसांकडून लक्‍झरी बस थांब्यांबाबतचे आदेश जारी


सकाळी 8 ते दुपारी 12, सायंकाळी 5 ते 9 नो एन्ट्री

पुणे – स्वारगेट ते सातारा रस्ता, पुणे-मुंबई रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता, पुणे-नाशिक रस्ता या रस्त्यावरील नेमून दिलेल्या थांब्यांवर लक्‍झरी बसेसना दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबता येणार नाही, असे आदेश वाहतूक पोलिसांनी बजावले आहेत.

स्वारगेट, व्होल्गा चौक, संगमवाडी, निगडी या अंतर्गत नेमून दिलेल्या मार्गांव्यतिरिक्त लक्‍झरी बसेस इतर कोणत्याही मार्गाचा वापर कोणत्याही वेळेत करणार नाहीत, असे या आदेशात वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या लक्‍झरी बसेस यांना सकाळी 8 ते दुपारी 12 तसेच संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत ठरवून दिलेल्या मार्गावर प्रवास करण्यासही आदेशाद्वारे बंदी करण्यात आली आहे.

-Ads-

पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून खासगी लक्‍झरी बस थांब्याबाबतचे आदेश जारी झाले असून, त्यांच्यासाठी मार्ग आणि वेळेची निश्‍चिती करण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी हे आदेश दिले आहेत.

शहरात लक्‍झरी बसेस यांना सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला होता. तसेच रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेतच प्रवेश करण्याबाबतचे आदेश तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. तसेच त्याबाबत एक ऑक्‍टोबर ते 15 ऑक्‍टोबर या कालवधीत लेखी हरकती-सूचनाही मागण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन तसेच ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांना वगळण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)