खासगी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी – रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला खासगी बसने जोरदार धडक दिल्याने पादचा-याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.29) दुपारी चार वाजता पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ प्रवेशद्वारासमोर घडली.

तुकाराम भालेराव (वय 51, रा. इंदोरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. भालेराव गुरूवारी दुपारी चार वाजता पांजरपोळ प्रवेशद्वारासमोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका खासगी बसची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात मध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बस चालक घटनास्थळी न थांबता पळुन गेला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)