खासगी टुर चालकाकडून साडेसहा लाखाची फसवणूक

 

पुणे,दि.29- एका खासगी टुर चालकाने 11 जणांनी सुमारे 6 लाख 30 हजाराची फसवणूक केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी त्र्यंबक थत्ते(73,रा.सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. चिंचवड रेल्वे स्थानक येथे असलेल्या खासगी टुर्स ट्रॅव्हलने नोव्हेंबर 2017 जाहिरात प्रसिध्द केली होती. यामध्ये लक्षव्दिप , कन्याकुमारी येथील सहलींचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानूसार फिर्यादी व त्यांच्या ग्रुपमधील इतर 11 जणांनी टुर कंपनीशी संपर्क साधून 6 लाख 30 रुपयांची रक्कम सहलिसाठी भरली. यांनतर टुर कंपनीने ओखी वादळामुळे सहल रद्द झाल्याचे सांगत तुमचे पैसे परत देतो असे कळवले. मात्र सहलिसाठी दिलेले पैसे टुर कंपनीने अद्यापही परत केले नाही. यामुळे फसवणूक झाल्याचा गुन्हा संबंधीत टुर कंपनीविरुध्द नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार एस.डी.ढमाले तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)