खासगी जागेतील डीपी न काढल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

पळशी – पोलीस प्रशासनाच्या मदतीने कुटूंबाला दमदाटी करून वैयक्तिक जमिनीत खासगी विद्युत डी. पी.उभारणाऱ्यां दत्तात्रय पोळ यांचा डि.पी. काढावा अन्यथा कुटूंबासह आत्मदहन करण्याचा इशारा पळशी, ता. माण येथील शेतकरी दिलीप माळवे यांनी तहसीलदारांना निवेदनद्वारे केला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पळशी गावातील शिवारातील माणगंगा नदीवरील के. टी. शेळके वस्ती बंधारा येथे सौ. शिल्पा दत्तात्रय पोळ, रा. मार्डी, ता. माण यांनी 2 आर क्षेत्र खरेदी केले असून त्या संपूर्ण क्षेत्रावर विहीर खोदकाम केले आहे. त्या विहिरीची नोंद केली आहे व तसेच त्यांनी माझ्या क्षेत्रात पोलीस प्रशासन यांच्या मदतीने मला व माझ्या कुटुंबाला दमदाटी करून माझ्या जमिनीत अतिक्रमण करून खाजगी शेती वीज डी.पी रोवला आहे व ते क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सौ. शिल्पा पोळ यांचे पती दत्तात्रय काशीनाथ पोळ मला वारंवार त्रास देत आहेत. माझ्या जमिनीतील डीपी काडून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा कुटुंबासह दि. 8 रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)