खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर

करमुक्त ग्रॅज्युईटीची मर्यादा 10 लाख रुपयांनी वाढविली.
नवी दिल्ली – खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक खुशखबर दिली आहे. खासगी क्षेत्रातील करमुक्त ग्रॅज्युईटीची मर्यादा 10 लाख रुपयांची वाढवून ती 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या संदर्भातील विधेयक आज संसदेमध्ये दुरुस्तीसह मंजूर करण्यात आले.

राज्यसभेत आज हे महत्त्वपूर्ण विधेयक दुरूस्तीसाठी मांडण्यात आले. मागच्या आठवड्यात लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅज्युईटी करमुक्त झाली होती. खासगी क्षेत्रालाही ही सुविधा लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील होते.

ग्रॅज्युईटी पगाराचाच एक भाग आहे. कर्मचाऱ्याने एखाद्या कंपनीत पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मालकाकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी दिली जाते. ग्रॅज्युईटीची ही रक्कम निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी दिली जाते. इन्कम टॅक्‍स कायद्यातंर्गत ग्रॅज्युईटीच्या रक्कमेवर कर आकारला जात नाही. ग्रॅज्युईटी संदर्भात आवश्‍यक दुरुस्तीसह विधेयक मंजुर झाले आहे. मध्यम आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)