खासगी ऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय…

मुंबई – मुंबई शहरातील पार्कींग समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात स्वतंत्र पार्किंग प्राधिकरण निर्माण करण्याच प्रस्तावच ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालीकेने आज न्यायालयात दिली.

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना पार्किंग उपलब्ध असल्याचे पुरावे सक्तीचे करण्याबाबत प्रशासनाने गंभीरतेने विचार करावा, असे मत हायकोर्टाने व्यक्त करताना सर्वसामान्य व्यक्तींनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्विकारण्यासाठी त्यात विकास करणे गरजेच असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच बेशिस्त पार्किंग आणि वाहतुक कोंडीची समस्या प्रत्येकालाच भेडसावते असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी सिंगापूर तसेच जपानच्या धर्तीवर आपल्याककडे पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचला आणि पर्याय शोधा, असे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)